
सोलापूर : दोन वर्षांपूर्वीची कागदपत्रे घेऊन आलेला एक दिव्यांग... दिव्यांग दिनाच्या दिवशी काम होईल या आशेने सर्वोपचार रुग्णालयात आलेला... जुन्या कागदपत्रांवर सर्व प्रकारच्या तपासण्या पूर्ण केलेल्या नोंदी... पण तुमची तपासणी आमच्याकडे झालीच नाही म्हणून नकार... पुन्हा चक्कर मारण्याची वेळ. दुसरीकडे दिव्यांग अस्मिता अभियानात तपासणी झालेल्या दिव्यांगाच्या युडीआयडी व रेल्वे सवलत प्रमाणपत्रांची शेकडो पाकीटे अशी दोन चित्रे दिसून येत होती.