
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. विशेषतः विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का देणारा राहिला आहे. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात देखील आहे. जिल्ह्यातील मातबर नेत्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून त्या-त्या मतदार संघावर वर्चस्व राहिलेल्या घराण्यांची सत्ता या निवडणुकीत संपुष्टात आली आहे. अगदी नवख्या उमेदवारांनी या घराण्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.