

Solapur District Bank Election Rajan Patil Announces Ten Likely Candidates as Malshiras Seat Remains Unresolved
sakal
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत उद्या (शुक्रवारी) संपणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २९) रात्री माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर (ता. मोहोळ) येथील निवासस्थानी भाजप समविचारी आमदार, माजी आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात ‘सोसायटी’ मतदारसंघातील ११ पैकी माळशिरस तालुका वगळता उर्वरित १० तालुक्यांमधील उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली. यात तीन आमदार, चार माजी आमदार व तीन पदाधिकारी असून, यांपैकी एक माजी आमदारपुत्र, तर एक आमदाराच्या कुटुंबातील आहे.