

Solapur District Central Cooperative Bank Election Candidate Selection
sakal
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इच्छुकांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. प्रत्येक तालुक्यातील विकास सोसायट्यांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. ‘उर्वरित आठ जागांवरील उमेदवार कोण असतील, हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चित करू’ असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीनंतर गोरे मुंबईला रवाना झाले.