सोलापूर : जिल्हात कोरोना टेस्ट घटल्या; दोघांचा मृत्यू

एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची व लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी अपेक्षित आहे.
कोरोना टेस्ट
कोरोना टेस्टTeam Esakal
Updated on: 

सोलापूर : कोरोनाच्या दोन्ही लाटेत जिल्ह्यातील 32 लाख 79 हजार 735 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात दोन लाख चार हजार 384 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील पाच हजार 126 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज ग्रामीणमध्ये आठजण पॉझिटिव्ह आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर शहरात एक पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला आहे. वास्तविक पाहता एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची व लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील टेस्टिंग घटले असून रविवारी (ता. 5) जिल्ह्यात एक हजार टेस्टदेखील झाल्या नाहीत.

शहरातील पाच लाख 21 हजार 871 संशितयांमध्ये 29 हजार 472 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील एक हजार 459 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 12 जण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत ग्रामीणमधील 27 लाख 57 हजार 864 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर त्यामध्ये एक लाख 74 हजार 912 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून तीन हजार 667 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना टेस्ट
कोरोनानंतर बंद झालेल्या शाळा सुरू होण्यास मुहूर्त मिळेना

सध्या 89 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी (ता. 6) अक्‍कलकोट, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे करमाळा, माढा, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी दोन तर माळशिरस, मंगळवेढा तालुक्‍यात प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. दिलासादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट तालुका कोरोनामुक्‍त झाला असून बार्शीतील 14, करमाळ्यातील नऊ, माढ्यातील 11, माळशिरस तालुक्‍यातील आठ, मंगळवेढ्यातील चार, मोहोळ तालुक्‍यातील पाच, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एक, पंढरपूर तालुक्‍यातील 29, सांगोल्यातील सहा तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com