solapur district labour federation election 109 application for 18 post politics
solapur district labour federation election 109 application for 18 post politicssakal

Solapur News : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशनसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल

आज छाननी : १८ जागांसाठी वाढली चुरस

Solapur News : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटी को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. संचालकांच्या १८ जागांसाठी एकूण १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या (शुक्रवार) सकाळी ११.३० वाजता महापालिका वरिष्ठ श्रेणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या इंद्रप्रस्थ सभागृहात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांनी दिली.

सर्वसाधारण मतदारसंघातील १३ जागांसाठी ८४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातील एक व सोलापूर शहरातून दोन, असे तेरा संचालक निवडले जाणार आहेत. महिला मतदारसंघातून दोन संचालक निवडले जाणार असून याकरिता नऊ अर्ज आले आहेत.

इतर मागासवर्गीय मतदार संघातून एक संचालक निवडला जाणार असून त्याकरिता ११ अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून एक संचालक निवडला जाणार असून त्यासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून एक संचालक निवडला जाणार असून त्याकरिता अकरा अर्ज आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com