Solapur Milk Union IssuesEsakal
सोलापूर
Solapur District Milk Union: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संकटात 'तीन-तेरा', संचालक मंडळावर बरखास्तीचा ठपका
Solapur Milk Union Issues: सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांची ८ मार्च २०२२ रोजी निवड झाली आणि ५ मार्च २०२५ रोजी त्यांचे संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश निघाला.
Solapur Milk Industry: सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांची ८ मार्च २०२२ रोजी निवड झाली आणि ५ मार्च २०२५ रोजी त्यांचे संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश निघाला. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यानंतर त्यांचे पुत्र रणजितसिंह यांच्या काळात जिल्हा दूध संघाला पुन्हा चांगले दिवस येतील, अशी असलेली अपेक्षा फोल ठरली. अवघ्या तीन वर्षातच जिल्हा दूध संघाचे अक्षरश: तीन-तेरा वाजल्याचे दिसत आहे.