
हुरड्याचा हंगाम सुरू झाला असून यावर्षी तीन हजार एकरावर हुरडा लागवड झाली आहे. यावर्षी हंगामात साठ कोटीपेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. ज्वारीचे कोठार मानल्या जाणाऱ्या सोलापूरची स्पर्धा छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगराच्या सीमेवरील हुरडा हबशी आहे. अजूनही सोलापुरातून बाहेरगावी हुरडा व्यापार सुरू होण्याची संधी समोर आहे.