सावधान..! जिल्‍ह्यातील भूजल पातळीत चिंताजनक घट

सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयाचे लाभक्षेत्र वगळता इतर सर्वच भागातील भूजल पातळीने तळ गाठल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
water
watersakal
Updated on
Summary

level

रोपळे बुद्रूक - अवर्षणग्रस्त सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयाचे लाभक्षेत्र वगळता इतर सर्वच भागातील भूजल पातळीने तळ गाठल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यापुढे पाणी वापराबाबत सर्वांनाच सावध रहावे लागणार आहे. पंढरपूर तालुक्यासह माढा, मोहोळ व माळशिरस तालुक्यातील एकूण ११४ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष अधिक आहे. त्यामुळे तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी या ग्रामपंचायतींची निवड आता केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेसाठी झाली आहे.

उजनी लाभ क्षेत्राबाहेरील भागात उन्हाळ्यामध्ये जवळपास सर्वच विहिरींची पाणी पातळी तळा- गाळाला गेल्याचे भूजल सर्वेक्षणात आढळून आले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला मे २०२२ व मागील ५ वर्षाची तालुका निहाय भूजल पातळीत बरीच तफावत असल्याचेही आढळून आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण ८७४ निरीक्षण विहिरी स्थापन केल्या आहेत. तसेच अटल भूजल योजनेअंतर्गत समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रती ग्रामपंचायत १० विहिरींची निवड भूजल पाणी पातळी मोजमाप करण्यासाठी करण्यात आलेली

आहे. दरम्‍यान या निरीक्षणाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. भूजल पातळी मोजल्‍यानंतर शेतकऱ्यांना त्‍यामाध्‍यमातून आपल्‍या परिसरातील भूजल पातळी समजणार आहे.

भूजल पातळी वाढवण्यासाठी उपाय योजना -

सोलापूर येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाकडून रिचार्ज शाफ्टच्या माध्यमातून कृत्रिम पद्धतीने भूजलात रुपांतर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इतर सर्व विभागातून जलस्त्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन करणे. विहिरी/विंधन विहिरी पुनर्भरण करणे. जलसंधारणाचे विविध उपचार व अनुषंगिक जाणीव जागृती, देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय, पाण्याची मागणी कमी करण्यासाठी जल बचतीच्या उपाययोजना करणे. शेतीच्या पाण्याची मागणी कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्लास्टिक आच्छादन, जैविक आच्छादन, हरित गृहे मिळवून देणे. लोक सहभागाद्वारे समाजाच्या पाणी बचतीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्याविषयी भूजल विभाग काम करत आहे.

आज निघणार भूजल दिंडी

उद्या शनिवारी (दि. १६ जुलै ) रोजी महाराष्ट्र शासनाचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल विकास यंत्रणेचा ५१ वा वर्धापन दिन आहे. हा दिन महाराष्ट्रात सर्वत्र भूजल दिन म्हणून साजरा होत आहे . यानिमीत्ताने जिल्हयात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर, माढा तालुक्यातील अंजनगाव, मोहोळ तालुक्यातील शेटफळ व पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रूक येथे भूजल दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट ग्रामपंचायतींमध्ये प्रामुख्याने लोकसहभागातून जल आराखडे तयार करून घेतले जात आहेत. शिवाय विविध विभागांच्या समन्वायातून पाणी उपलब्धता वाढविण्‍यासाठी जलसंधारणांची कामे व पाणी बचतीसाठी आम्ही शेतकऱ्यांना सूक्ष्मसिंचनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. जिल्ह्यातील घटत असलेली भूजल पातळी स्थिर करणे व वरती आणणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

- मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com