थोडक्यात:
सोलापूरमध्ये डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी स्वतंत्र बक्षिस देण्याची घोषणा गौरीशंकर कोंडा यांनी केली आहे.
मिरवणुकीत डीजेचा आवाज लोकांचे आरोग्य बिघडवत असल्याने डीजेमुक्तीची गरज भासते.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डीजेमुक्त मिरवणूक व उत्सव करणे अत्यंत आवश्यक आहे.
DJ-free Ganpati Celebration: डीजेमुक्त सोलापूरसाठी निश्चितपणे सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यंदापासून डीजे मुक्त मंडळासाठी स्वतंत्र बक्षिस दिले जाईल अशी घोषणा श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली आहे. तर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघाने देखील रविवारी (ता. १७) गणेशोत्सवाला डीजे मुक्त करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.