
जगावर राज्य करण्याचे स्वप्न बाळगलेला हिटलर, सुंदर विचार देणारे साने गुरुजी, मनःशक्तीच्या माध्यमातून खंबीरपणाचे शिक्षण देणारे स्वामी विज्ञानानंद, आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज, शीतल आमटे अशा महनीय व्यक्तींनी मानसिक तणावातून आत्महत्येचा मार्ग पत्करला. या सर्वांना व्यक्त होण्यासाठी केवळ पाहिजे तसे आऊटलेट नसल्याने हा प्रकार घडला. मित्र, परिवार यांच्यासमवेत हसा, रडा, मोकळे व्हा, संवाद साधा अशीच भावना शुक्रवारच्या रात्रीच्या सोलापुरातील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.