Dr. Ambedkar Jayanti Solapur
esakal
सोलापूर : शहरात १४ ते १९ एप्रिल या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार (Solapur Dr. Ambedkar Jayanti 2026) आहे. दरवर्षी जयंतीनिमित्त एकाच दिवशी सर्व मंडळांच्या मिरवणुका निघतात. पण, यंदा दोन मध्यवर्तींनी वेगवेगळ्या दिवशी मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेला छेद देणारा हा निर्णय मागे घ्यावा, त्यासाठी पोलिसांनी व समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा, अशी निवेदने छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानतर्फे शहर पोलिस व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आली.