Solapur : यापुढेही पाण्याच्याच मुद्द्यावर निवडणुका

सांगाेल्यातील राजकारणात श्रेयवाद; जलपूजनातूनही पक्षीय ‘वॉर’, नागरिक त्रस्त
water
water sakal

सांगोला - तालुक्यातील जनतेने आमदार बदलले, राज्यातील मायबाप जनतेने सरकार बदलले. राज्याची सत्ता चालवण्याची सर्वच प्रमुख पक्षांना संधीही मिळाली. अशा परिस्थितीतही सांगोला तालुक्यातील निवडणुकांमधील पाण्याचा मुद्दा काही बदललेला दिसून येत नाही. गेली अनेक वर्षे निवडणुका आल्या म्हटले, की पाण्याचा मुद्दा समोर येतच होता. आगामी निवडणुकांतही हा मुद्दा पुन्हा चांगलाच गाजणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. यापुढेही पाण्याचा राजकारणातील श्रेयवाद, पाणी पूजनाचे पक्षीय ‘वॉर’ दिसून येतील.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीतही गाजणार पाण्याचा मुद्दा

तालुक्यात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी विविध नेतेमंडळी आपल्या परीने प्रयत्न करतात. पाणी आल्यास पाणी पूजनाबरोबरच आपण कसे प्रयत्न केले, याबाबत ते जाहीरपणे बोलतात. परंतु, वेळेवर व हक्काचे पाणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची जबाबदारी कोणीच घेत नाही.

पाण्यातच खरे राजकारण मुरतंय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका पुन्हा एकदा तालुक्यातील या प्रमुख उपसा सिंचन योजनेच्या पाणी प्रश्नावरच फिरणार असून, सामान्य शेतकरीच याबाबत उमेदवारांना, लोकप्रतिनिधींना जाब विचारतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

water
Solapur Ganpati Visarjan 2023 : मोहोळ तालुक्यातील गणेश विसर्जनासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन सज्ज

पाण्याचे नियोजन लागेना, हक्काचे पाणीही मिळेना

यावर्षी सांगोला तालुक्यात सरासरीच्या फक्त ५५ टक्केच्या आसपासच पाऊस झाला आहे. सद्य:परिस्थितीत मोठा पाऊस न झाल्यास यापुढे शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. यावेळी नीरा उजवा कालव्याला आलेल्या पाण्यासाठी या लाभक्षेत्रातील टेलच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आंदोलने करावी लागली होती.

पाणी येत असले तरी ते नियोजनाप्रमाणे येत नसून ते नेहमीच कमी दाबाने मिळते. त्यामुळे तालुक्यातील नीरा उजवा हक्काचे पाणी वेळेवर व टेलच्या शेतकऱ्यांना नियमानुसार मिळत नाही. हे पाणी जाते तरी कुठे? हा राजकीय डावपेचच असल्याचे सामान्य शेतकरी बोलत आहेत.

water
Solapur Ganpati Visarjan 2023 : मोहोळ तालुक्यातील गणेश विसर्जनासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन सज्ज

पाण्यातही श्रेयवादाची झालर

टेंभू, म्हैसाळ व नीरा उजव्याच्या पाण्यासाठी, त्याच्या नियोजनासाठी आम्ही अधिकाऱ्यांबरोबर, मंत्र्यांसोबत कशा बैठका घेतल्या, याबाबत व आलेल्या पाण्याच्या पूजनाबाबत सध्या तालुक्यात पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे. या श्रेयवादातूनच राजकारणातील पक्षीय ‘वॉर’ होणार आहेत. निवडणुका जशा जवळ येतील तसा पाण्याबाबतचा श्रेयवाद पुन्हा उफाळून येणार आहे.

water
Nagpur News : उपराजधानीत दोन ठिकाणी आग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com