esakal | Solapur: इलेक्‍ट्रिक वाहनांना आता महावितरणची ‘ऊर्जा’
sakal

बोलून बातमी शोधा

Electric-Vehicle

शहरातील सात सब स्टेशनच्या ठिकाणी चार्जिंग पॉईंटची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर : इलेक्‍ट्रिक वाहनांना आता महावितरणची ‘ऊर्जा’

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असून, महावितरणने इलेक्‍ट्रिक वाहनांबाबत पुढाकार घेत सकारात्मक पाऊल टाकले आहे. मात्र, आगामी काळात रस्त्यावर इलेक्‍ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर धावू लागल्यास त्यादृष्टीनेही वाहने चार्ज करण्याची सोय उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच महावितरणने शहरातील सात सब स्टेशनच्या ठिकाणी चार्जिंग पॉईंटची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिनाभरात या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

महावितरणकडून शहरातील जुळे सोलापूर, इंडस्ट्रियल इस्टेट, पेपर प्लान्ट, आदित्य नगर, पोटफाडी चौक सब स्टेशन, एमआयडीसी सब स्टेशन, विडी घरकुल सब स्टेशन आदी सात ठिकाणी चार्जिंग पॉईंटच्या कामास आता गती मिळणार आहे. या सबस्टेशनच्या ठिकाणी येत्या महिनाभरात कामास सुरवात होवून लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. सब स्टेशनमध्ये दोन ट्रान्सफॉर्मर तसेच आठ सर्किट बसवले जाणार आहेत. सब स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर सर्व सबस्टेशन एकमेकांशी जोडले जाणार आहेत. कोणत्याही परिसरात अधूनमधून वीज खंडित होत असते. काही वेळा मोठा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यास उशीर लागतो. बिघाड दुरुस्त होईपर्यंत ग्राहकांना अंधारात बसावे लागते. मात्र सात सब स्टेशन जोडली गेल्यानंतर बिघाड दुरुस्तीचे काम होईपर्यंत ज्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे, त्या भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करणे शक्‍य होण्यास मदत होईल. परिणामी विजेविना ग्राहकांचे हाल होणार नाहीत, असे महावितरचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय होणार फायदे

ग्राहकांना पैसे देवून करावे लागणार वाहन चार्जिंग

इलेक्‍ट्रिक वाहनांमुळे वायूप्रदूषणाला आळा बसणार

एकाचवेळी चार गाड्या थांबण्याची व्यवस्था होणार

एका चार्जिंग पॉईंटवर ५ कर्मचारी काम करतील

महावितरणच्या उत्पन्नात होणार वाढ

इलेक्‍ट्रिक वाहनांमुळे महावितरणकडून शहरातील महावितरणच्या सबस्टेशनजवळ चार्जिंग पॉईंच्या कामास येत्या महिनाभरात सुरवात होणार आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिक वाहनचालकांसाठी आणि महावितरणच्या उत्पन्नातदेखील यामुळे वाढ होण्यास मदत होणार

आहे.

- चंद्रकांत दीघे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सोलापूर शहर

loading image
go to top