
सोलापूर: ओंकार यांचे शिक्षण उपळे दुमाला येथील जिल्हा परिषदेत झाले. वडील शासकीय नोकरीत तर आई गृहिणी आहे. माध्यमिक शिक्षण वखारिया हायस्कूलमध्ये घेतल्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरवातीला पदविका व नंतर पदवी शिक्षण घेतले. मेकॅनिकल विषयात त्यांनी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. आता याच विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांना कॅम्पसमध्ये जॉबची ऑफर आली. तीन वर्षे त्यांनी जॉब केल्यानंतर त्यांनी मार्केट रीसर्च आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयावर काम सुरु केले. यावर अभ्यास करताना त्यांना लिफ्टच्या प्रोजेक्टवर सर्वकष अभ्यास मांडायचा होता. त्यासाठी त्यांनी अभ्यासातून लिफ्टची निर्मिती, तंत्रज्ञान, व्यवसाय व स्पेअर पार्ट या सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास केला. तेव्हा लिफ्टबद्दलचे अनेक पार्टससाठी स्थानिकांना अन्य राज्यावर अवलंबून राहावे लागते.