

सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दुष्काळी माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यावर जबाबदारी आली असून जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने आज सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने मंगळवेढेकरांच्या रखडलेल्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या.
मागील पाच वर्षात सोलापूरला पाच पालकमंत्री मिळाल्यामुळे तालुक्यातील काही प्रश्नांना न्याय मिळाला नाही मात्र आता जयकुमार गोरे सारखा अनुभवी आणि दुष्काळी परिस्थितीची जाणीव असलेला पालकमंत्री मिळाल्यामुळे हे प्रश्न निश्चितच सुटण्याच्या अपेक्षा मंगळवेढेकराकडून व्यक्त होऊ लागल्या. मंगळवेढ्यासारख्या कायम दुष्काळी तालुका असलेल्या माण खटाव तालुक्यात त्यांनी अलीकडच्या दहा वर्षाच्या दुष्काळमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून मतदारसंघाची दुष्काळी दाहकतेपासून सुटका केली अशा परिस्थितीत त्यांच्याच बरोबरीने दुष्काळी चटके सोसणाऱ्या मंगळवेढेकरांना मात्र अजूनही त्यांच्या पाण्याबरोबर अन्य समस्येचे चटके सोसावे लागत आहेत