सोलापूर : अतिवृष्टीची जिल्ह्याला ८१ कोटीची मदत

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सोलापूर जिल्ह्यासाठी ८१ कोटी रुपये मंजूर झाले
crop insurance
crop insurancesakal
Published on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सोलापूर जिल्ह्यासाठी ८१ कोटी रुपये मंजूर झालेअसून, त्यापैकी ६० कोटी १८ लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. आता तहसीलस्तरापर्यंत ही रक्कमही पाठवण्यात आली असून, येत्या दोन दिवसात या मदतीचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांना कमी-अधिक प्रमाणात त्याची झळ बसली. बार्शी, अक्लककोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ७९ हजार ४४० शेतकऱ्यांचे ६७ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ६० कोटी १८ लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात नव्या नियमानुसार ८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यापैकी ६० कोटी प्रत्यक्षात प्रशासनाकडे आले आहेत. ते आता तहसीलस्तरावर देण्यात आले आहेत. लवकरच त्याचे वाटप होणार आहे.

crop insurance
वाशीम : कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सहा दिवस बंद

तालुकानिहाय मिळणारी मदत आणि कंसात नुकसानग्रस्त क्षेत्र
उत्तर सोलापूरला ६ कोटी २१ लाख (नुकसानग्रस्त क्षेत्र ६८६२ हेक्टर), बार्शी तालुक्याला ३५ कोटी ५६ लाख रुपये (४२ हजार १८८ हेक्टर) दक्षिण सोलापूर ३ कोटी ३७ लाख रुपये (४००६ हेक्टर), अक्कलकोट ४ कोटी ५८ लाख रुपये (५६४१ हेक्टर), माढा ४ कोटी ५६ लाख रुपये (४०७९ हेक्टर), मोहोळ ५ कोटी ८८ लाख रुपये, (४४१७ हेक्टर)

अशी मिळेल मदत
नव्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जिरायत पिकांसाठी १० हजार रुपये, बागायती पिकांसाठी १५ हजार तर फळ पिकांसाठी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जाम केली जाणार आहे. दिवाळीच्या आधी तातडीने ही मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com