
Solapur: पोखरापूर ता मोहोळ येथील एका 49 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार ता 23 रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी मोहोळ पोलीसात आकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. दत्तात्रय विश्वनाथ लेंगरे रा पोखरापुर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या संदर्भात मोहोळ पोलिसाकडुन मिळालेल्या माहिती नुसार,पोखरापूर ता मोहोळ येथे दत्तात्रय लेंगरे हे कुटुंबा समवेत राहत होते. शेती व दुग्ध व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करीत होते.
रविवार ता 23 जून रोजी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान लेंगरे यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.
त्याना तत्काळ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासुन उपचारापूर्वी ते मृत झाल्याचे घोषीत केले. मात्र आत्महत्या कशासाठी केली हे समजु शकले नाही.
मृत दत्तात्रय लेंगरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची खबर चंद्रकांत लेंगरे यांनी मोहोळ पोलीसात दिली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.