Maharashtra farmer loan waiver latest news
esakal
सोलापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीस सोलापूर जिल्ह्यातील ५९ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ३० हजार ५०० शेतकऱ्यांच्या दोन याद्या प्राप्त झाल्या (Solapur Farmer Loan Waiver 2026) आहेत. पण, यातील जिल्हा बँकेच्या ४७२ तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुटी होत्या. काहींनी जादा व्याज आकारले होते. शनिवारी (ता. २६) त्रुटी दुरुस्त करून याद्या पुन्हा अपलोड झाल्या आहेत. आता आठ दिवसांत पात्र शेतकऱ्यांची नवी यादी जाहीर होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.