Solapur : मानेगावात आग्या मधमाशांचा हल्ला ; बचावासाठी काहींच्या विहिरीत उड्या; ११ जखमींवर उपचार सुरू

अचानक एकाचवेळी दहा-बारा पेशंट दवाखान्यात आले.
bee hive
bee hivesakal

वैराग - वडिलांच्या वर्षश्राद्धा निमित्त सर्व कुटुंबीय, पै- पाहुणे शेतामध्ये धार्मिक विधीसाठी जमले. अचानक आग्या मोहोळाच्या माशांनी जमलेल्या लोकांवर हल्ला केला. काहींनी जवळच्या विहिरीतील पाण्यात उड्या मारल्या, मात्र काहींच्या संपूर्ण शरीरावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात असह्य वेदना झालेल्या ११ जणांवर वैराग येथे खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.

ही घटना मानेगाव (ता. बार्शी) येथे शुक्रवारी (२९ सप्टेंबर दुपारी घडली. वर्षश्राद्धानिमित्त शेतात जमलेल्या लोकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. तो दोन- चार जणांच्या जिवावर बेतला असता, परंतु दवाखान्यात वेळेत उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळला.

अर्जुन बिभीषण डाके (रा. मानेगाव) यांच्या वडिलांचे प्रथम वर्षश्राद्ध होते. या धार्मिक विधीच्या कार्यक्रमासाठी त्यांचे सुर्डी, रुई, वैराग, मानेगाव व दारफळ येथील पै- -पाहुणे असे सुमारे शे-दीडशे लोक एकत्र आले होते. डाके यांच्या शेतात बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडावर आग्या मधमाशांचे पोळे आहे याची त्यांना कल्पना नव्हती.

दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतातील वडिलांच्या समाधीच्या दर्शनासाठी सर्वजण निघाले असता बांधावरील मोठ्या चिंचेच्या झाडावर आग्या मोहोळाच्या चार-पाच माशा खाली आल्या. त्या चार-पाच जणांना चावल्या. त्या माशा हाताने मारल्या. त्यावेळी काही क्षणातच झाडावरील आग्या मोहोळाच्या माशांनी काही अंतरावर असलेल्या व झाडाखाली बसलेल्या लोकांवर एकच हल्ला चढवला.

मधमाशांच्या चाव्याच्या भीतीने पाच-सहा जणांनी पळ काढला व जवळ असलेल्या दोनशे फूट अंतरावरील विहिरीच्या पाण्यात माशांपासून बचाव करण्यासाठी उड्या मारल्या. त्यामुळे बहुतांश माशा त्यांच्यामागे धावल्या मात्र इतर माशांनी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या लोकांवर हल्ला चढवला.

यामध्ये महानंदा बनसोडे, सुलोचना डाके, दीप डाके, नवनाथ डाके, शिवाजी डाके, शंकर डाके, महेश्वर डाके, ज्ञानदेव डाके, अर्जुन डाके, कानिफनाथ डाके, इंदुमती डाके अशा सुमारे अकराजणांना माशांच्या चाव्याने विषबाधा झाली. अंगावर खाज येणे, सूज,चक्कर येणे, मळमळणे असा त्रास होऊ लागल्याने सर्वांना वैरागच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार केले. सध्या चार वर्षांच्या स्वरा कृष्णा माळी या चिमुकलीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

अचानक एकाचवेळी दहा-बारा पेशंट दवाखान्यात आले. सर्वजण गोंधळलेले होते. त्यात जगन्नाथ माळी (वय ६५) व इंदुमती डाके (वय ५५) हे माशांच्या चाव्यामुळे त्रस्त झाले होते. सर्वप्रथम त्यांच्यावर तत्काळ उपचार केले. दोनजण बेशुद्ध पडले होते. काहींच्या शर्टात, अंगात, कानात माशा शिरल्या होत्या. इंदुमती डाके यांच्या तर कानामध्ये अडकलेली माशी औषधी स्प्रे मारून बाहेर काढली.

डॉ. सुहास मोटे, वैराग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com