सोलापूर : सशाची शिकार करणारे दोघे अटकेत : वनविभागाची कारवाई

दोघांवर वनविभागाची कारवाई , 23 तारखे पर्यंत वनकोठडी
Solapur Forest department action
Solapur Forest department actionsakal
Updated on

मोहोळ : ससा या वन्य प्राण्याची शिकार करताना मोहोळ तालुक्यातील दोघांवर वन विभागाने कारवाई केली असून, त्यांना 23 तारखे पर्यंत वनकोठडी मिळाली आहे. वन विभागास ता 20 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन वन परिक्षेत्र मोहोळ अंतर्गत व्हिडिओच्या माध्यमातून ससा या वन्यप्राण्याची शिकार करून खाण्या च्या उद्देशाने सदर वन्यप्राण्याची कातड़ी काढत असल्याचे निदर्शनास आले.

सदरचा व्हिडिओ हा पोखरापुर ता मोहोळ हद्दीतील असल्याचे समजले,यावरून मोहोळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे यांनी व त्यांचे अधिनस्त असलेले क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह पोखरापुर गावामधे जाऊन चौकशी केली असता हणमंत विठ्ठल खंदारे वय (48), बिरुदेव विट्ठल खंदारे वय (52) या दोन संशयीतांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून चौकशी करून त्यांचे विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना प्रथमश्रेणी न्यायालय मोहोळ यांचे समोर उपस्थित केले असता त्यांना 23 जुलै पर्यंत वनकोठड़ी मिळाली आहे.

सदरची कारवाई सोलापुर उपवनसंरक्षक- डी एम पाटिल,सहाय्यक वन संरक्षक (रोहयो)सोलापुर- एल ए आवारे, सहाय्यक वन संरक्षक( कॅम्पा)- बी जी हाके यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ वन परिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे, वनपाल एस जी जवळगी, वनरक्षक एस आर कुर्ले(मोडनिंब),वन रक्षक एस टी थोरात(कामती) व कायम वनमजूर यांच्या पथकाने पूर्ण केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सतीश उटगे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com