Solapur : स्वाभिमानीची गांधीगिरी ;शेतकरी रक्ताने लिहिणार पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

write letter in blood

Solapur : स्वाभिमानीची गांधीगिरी ;शेतकरी रक्ताने लिहिणार पत्र

निमगाव : राजेवाडी येथील सदगुरू श्री श्री श्री साखर कारखान्याकडे मागील गाळप हंगामातील ऊस बिले थकीत आहे. थकीत २२३ रुपयांचा ऊस बिल हप्ता थकला आहे. कोरोनानंतर साजरी होणारी मायबाप शेतकऱ्यांची पहिली दीवाळी गोड व्हावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील २०० शेतकरी कारखाना कार्यस्थळावर जाऊन स्वतःचे रक्त काढून कारखान्याचे अध्यक्ष एन शेषागिरी राव यांना ही २०० पत्र भेट देऊन त्यांचा शाल ,श्रीफळ व फेटा बांधून गांधीगिरीने सत्कार करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी ही माहिती दिली.

बोरकर म्हणाले की,मागील गाळप हंगामात राजेवाडीच्या सदगुरु साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २६६० रुपये प्रति टन ऊस बिल देतो, असे गावोगावी जाऊन सांगितले. प्रत्यक्षात मात्र २४३७ रुपये बिल देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. वास्तविक पाहता उर्वरित २२३ रुपये ऊस बिल दिवाळीच्या अगोदर देणे क्रमप्राप्त असताना उर्वरित ऊस बिल दिले जात नाही.याबाबत वारंवार भेटून, विनंती करूनही कारखाना प्रशासन व अध्यक्ष यांच्याकडून मागणी पूर्ण होत नसल्याने गांधीगिरी करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

यांनी झोपेचे सोंग घेतले आहे यामुळे शेवटचा पर्याय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्यावर जाऊन चेअरमन एन शेषागिरी राव यांना कारखाना कार्यस्थळावरच स्वतःचे रक्त काढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी २०० पत्र देणार आहेत .

उद्रकेला कारखाना राहील जबाबदार

राजेवाडी कारखान्यास ऊस वाहतूक करणारी वाहनेही शेतकऱ्यांचीच आहेत, यामुळे या वाहनधारकांनी देखील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊस वाहतूक बंद करावी व कारखाना प्रशासनास उर्वरिथ थकीत बिल देणे भाग पाडावे. शेतकऱ्यांची दीपावली गोड करावी अन्यथा ऊस वाहतूक बंद करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या उद्रेकाला कारखाना प्रशासनाबरोबरच वाहनधारकांना देखील सामोरे जावे लागेल. परिणामास कारखाना प्रशासन व वाहनधारक जबाबदार राहतील.