सोलापूर : शहरातील लष्कर परिसरातील बलरामवाले कुटुंबावर गॅस गळतीमुळे (Solapur Gas Leak) भीषण संकट ओढावले. सुरुवातीला घरातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर उपचारादरम्यान आजी विमलबाई यांनीही अखेरचा श्वास घेतला. इतक्यात अजून एक वाईट बातमी आली, चिमुकल्यांची आई रंजनाबाई यांचाही मृत्यू झाला. अशा रीतीने या कुटुंबातील चार जणांचा एकामागून एक मृत्यू झाल्याने संपूर्ण सोलापूर शहर हादरले आहे.