esakal | सोनपावलांनी आगमन झालेल्या गौरीसमोर विद्युत रोषणाई
sakal

बोलून बातमी शोधा

gauri

सोनपावलांनी आगमन झालेल्या गौरीसमोर विद्युत रोषणाई

sakal_logo
By
हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा (सोलापूर) : गौरीचा सण मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात साजरा करत असताना अनेकांनी गौरी समोरील देखाव्यात प्रबोधनाचे संदेश देत सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबवला. गेले मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे राज्यातील मंदिरासह अनेक धार्मिक सणावर संक्रात आल्याने हे धार्मिक सण लाॅकडाऊन झाले. त्यामुळे सणाच्या निमित्ताने एकत्र होणारे कुटुंबातील नागरिक हे एकत्र होऊ शकले नाहीत मात्र तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागल्यामुळे दोन दिवसापूर्वी बाजारांमध्ये गणपती व गौरीची आरती लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून साहित्याची खरेदी केली. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव नसला तरी घरातील गणपती समोर विविध विविध रंगाचे विद्युत रोषणाई करून व आकर्षक सजावट करून गणपतीला सजवले.

अशात काल सायंकाळी सोनपावलांनी आगमन झालेल्या गौरीसमोर विद्युत रोषणाई व देखावे करून गौरीची स्थापना केली त्यामध्ये गौरी समोर विविध खेळणी, खाद्य पदार्थ, फळे, याचबरोबर प्रबोधनाचे संदेश देणारे फलक लावले.

हेही वाचा: हिंगोलीत मागील चोविस तासात ३.४० मिलिमीटर पावसाची नोंद

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागामध्ये बहुतांश घरांमध्ये गौरीची स्थापना करण्यात आली. समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी काही चुकीच्या गोष्टीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे त्यामुळे अशा सणाच्या माध्यमातून प्रबोधन करावे लागत आहे. यामध्ये मास्क वापरा कोरोनाचा संसर्ग टाळा,व्यसनापासून दूर रहा,मुली वाचवा, वृक्ष दारी आरोग्य घरी, प्रदूषण टाळा, गणेश विसर्जन घरच्या घरी, पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असे संदेश सध्याच्या काळातील साक्षर पिढीसमोर धार्मिक सणाच्या माध्यमातून प्रबोधन करून जनजागृती करण्याची वेळ आली.

पिढ्यान पिढ्या पासून सासरी चालत आलेली ही प्रथा आहे मला पर्यावरणाची आवड असल्यामुळे मी जेव्हापासून ह्यात लक्ष घातले तेव्हापासून पर्यावरणातील घटकांचा मागील दहा वर्षापासून सजावटीसाठी वापर करते.

- विजया ज्ञानेश्वर कोंडू भैरी, संभाजीनगर (मंगळवेढा)

loading image
go to top