सोलापूर : सिद्धेश्वर, हसन, म्हैसूर, आदी एक्सप्रेसमध्ये मिळणार जनरल तिकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ticket

सोलापूर : सिद्धेश्वर, हसन, म्हैसूर, आदी एक्सप्रेसमध्ये मिळणार जनरल तिकीट

सोलापूर: मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या सोलापूर-सिद्धेश्वर, सोलापूर-हसन आणि सोलापूर-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये येत्या ता. 29 जूनपासून जनरल तिकीट मिळणार असून, प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे तब्बल दोन वर्षापासूनची सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या बंद करून सर्व एक्सप्रेस गाड्यांचे जनरल तिकीट बंद केले होते. तसेच एक्स्प्रेस गाड्यांना विशेष एक्सप्रेसचा दर्जा देऊन आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवासाची सक्ती करण्यात आली होती. मात्र कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हळूहळू मासिक पास, जनरल तिकीट करण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान एक्सप्रेस गाड्यांनाही मासिक पास देण्यात येत असून 29 जूनपासून जनरल तिकीट मिळणार आहे.

या गाड्या आहेत सुरू

सोलापूर- पुणे हुतात्मा एक्सप्रेस, सोलापूर- सिद्धेश्वर एक्सप्रेस, मुंबई गदग एक्सप्रेस, सोलापूर- हसन एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, हुसेनसागर एक्सप्रेस, कराईकल एक्सप्रेस, एलटीटी-कोईमतूर एक्सप्रेस, सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने मध्य रेल्वेकडून जनरल तिकिटावर ता. 29 जूनपासून प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेकडून तशी गाड्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

दोन वर्षापासून जनरल तिकीट बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र जूनपासून प्रवाशांना जनरल तिकीट मिळणार असल्याने प्रवाशांची मोठी अडचण दूर झाली आहे.

- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर

Web Title: Solapur General Tickets Available Siddheshwar Hasan Mysore Etc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..