
सोलापुर : "शासन आपल्या दारी" उपक्रमाचा लाभ घ्या,जिल्हाधिकारी शंभरकर
मोहोळ: कोविड कालावधी मध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ घेणे कठीण झाले होते, मात्र त्यानंतर प्रशासनाच्या वतीने अडचणीवर मात करून सकारात्मक भूमिका घेत आपले काम सुरू ठेवले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजना समजावून घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून, लाभ घ्यावा प्रशासन अडचणीवर मात करण्यासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
महसूल प्रशासन व सर्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने पेनूर ता मोहोळ येथे तालुकास्तरीय सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, गटविकास अधिकारी गणेश मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, दूध संघाचे उपाध्यक्ष दिपक माळी, रामदास चवरे, सरपंच सुजित आवारे, उपसरपंच मयुरी चवरे, शुभांगी चवरे, सागर चवरे, हरिश्चंद्र चवरे, निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, महसूल नायब तहसीलदार लिना खरात, आदीसह सर्व मंडळ निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. यावेळी या अभियानाचा 981 जणांनी लाभ घेतला. यात 293 जणांना जात प्रमाणपत्र,28 जणांना शिधापत्रिका, 35 जणांना फेरफार आदालतीच्या माध्यमातून सातबाराचे वितरण, 216 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ, कोरोना कालावधीत मयत झालेल्या 154 जणांना संरक्षण अधिकारी विभागामार्फत लाभ दिला, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांनी जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान जीवन सुरक्षा योजनेचा विमा उतरविला. महिला आर्थिक विकास महामंडळा च्या माध्यमातून 7 बचत गटांना पाच लाख चाळीस हजार रुपयाचे कर्ज वितरित केले, तालुका कृषी विभागाने दहा लाभार्थ्यांना अवजारे वाटप केली, बाल विकास प्रकल्प विभागामार्फत तीन लाभार्थ्यांना 75 हजार रुपयांचे अनुदान वाटप केले, 15 जणांना मतदार ओळखपत्राचे वाटप केले. एकाच छताखाली सर्व माहिती व प्रक्रिया संपन्न झाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
Web Title: Solapur Government Your Doorstep Initiative Collector Shambharkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..