

सोलापूर : जीएसटी विभागाच्या थकबाकीदारांसाठी असलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९० व्यावसयिकांनी ३४ लाख ९९ हजार १२७ रुपयांचा भरणा केला.जीएसटी विभागाकडून अभय योजनेअंतर्गत सोलापूर विभागात एकूण १५९६ जीएसटीधारक पात्र होते. त्यांच्याकडून योजनेतील तडजोडीनुसार एकूण २६९ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. त्यानुसार जीएसटी विभागाने थकबाकीदारांची वर्गवारी करून त्यांना योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरवात केली.
या योजनेची मुदत ही सप्टेंबर २०२२ आहे. मुदत संपण्यास आणखी चार महिन्यांचा अवकाश असल्याने थकबाकीदारांकडून योजनेला संथ प्रतिसाद आहे. योजनेच्या संदर्भात जीएसटी प्रॅक्टिशनर संघटना व इतर संघटनांसोबत खात्याकडून बैठका घेण्यात आल्या. आता जीएसटी खात्याकडे एकूण ९० थकबाकीदारांनी अभय योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यांच्याकडून ३४ लाख ९९ हजार १२७ रुपयांचा महसूल जीएसटी विभागास मिळणार आहे. याशिवाय १० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या २१३ थकबाकीदारांकडून ११ लाख ४१ हजार १६८ रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. ही प्रकरणे देखील लवकरच पूर्ण केली जाणार आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत जीएसटी विभागाने १ हजार ९३५ थकबाकीदारांकडून संपूर्ण म्हणजे २६९ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सुरवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.