सोलापूर : ट्यूबमधील हातभट्टी दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातभट्टी दारू जप्त

सोलापूर : ट्यूबमधील हातभट्टी दारू जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ८) बोलेरो वाहनातून पंढरपूर शहरात आणण्यात येणारी ५०० लिटर हातभट्टी दारु जप्त करुन पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूरच्या पथकाने पंढरपूर शहरातील सरगम टॉकिज जवळ सापळा लावून संशयित वाहन (एमएच ४५ ए ८०१५) अडवून त्याची तपासणी केली. त्या वाहनामध्ये हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण ९ रबरी ट्युब मिळून आल्या. या ५०० लिटर दारुची किंमत २५ हजार रुपये एवढी होती. दारु व वाहनासह एकूण पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयित रमेश गोपीचंद राठोड (रा. वडजी तांडा, ता. दक्षिण सोलापूर) याला अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीमध्ये त्याने ही हातभट्टी दारु वडजी तांड्यावरुन पंढरपूर शहरात विक्रीकरिता आणल्याचे संशयिताने सांगितले. ही कारवाई खात्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. ए. मुळे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री. मुंढे, जवान गणेश रोडे यांच्या पथकाने पार पाडली. तसेच एका अन्य कारवाईत सोलापुरातील विजापूर रोडवरील नेहरुनगर परिसरात मंगळवरी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास धाड टाकून ममता शिवाजी राठोड या महिलेच्या ताब्यातून २० हजार ५०० रुपये किंमतीची ४०० लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहिमेत १७ लाखाचा मुद्देमाल जप्त

१ जून ते ८ जून या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात ३७१० लिटर हातभट्टी दारु, १८ लिटर देशी दारु, ११ लिटर विदेशी दारु, ४८०० लिटर गुळमिश्रित रसायन व १७५ लिटर ताडी जप्त करण्यात आली. मुद्देमालात ३ चारचाकी वाहने व ३ चाकी वाहनांचा समावेश आहे. मुद्देमालाची किंमत १७ लाख १८ हजार इतकी आहे.

Web Title: Solapur Hatbhatti Liquor Seized

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top