

A demand has been made to urgently fill more than 27 vacant posts in the health department across Mangalwedha taluka.
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सध्या 27 पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे त्यामुळे ती रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.