Solapur : पंचनाम्यासाठी पीक पाण्यातच ठेवायचे का ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

पंचनामे करण्यासाठी आलेल्या आधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा सवाल ; सरसकट नुकसान भरपाई मागणी
Solapur Heavy Rain Crop Damage
Solapur Heavy Rain Crop Damage
Updated on

सांगोला : 'साहेब, अहो तुमच्या पंचनाम्यासाठी थोडंफार राहिलेलं पिकं ते पण पाण्यातच ठेवू का ? द्यायचं असेल तर सरसकट नुकसान भरपाई द्या, नाहीतर राहू द्या म्हणाव सरकारला !' सांगोला तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असून तालुक्यातील सर्वाधिक 170 टक्के पेक्षा जास्त पाऊस झालेल्या संगेवाडी मंडळमध्ये महसूल व कृषी अधिकारी पंचनामे करताना शेतकरी अधिकाऱ्यांना बोलत होते.

अनेक शेतकऱ्यांचे शेतात सध्या पीकच नसल्याने पंचनामे करण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत तर शेतकऱ्यांनी पाऊस संपल्या संपल्या पाण्यातच पिके काढून घेतल्याने त्यांचे पंचनामे करणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने 'पंचनामाचे वराती मागून घोडेच' सुरू केल्याची सद्य परिस्थितीत दिसून येत आहे.

सांगोला तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले. परतीच्या सततच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेले पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात या अगोदरच डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्याने सूर्यफूल मका इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आले होती. परंतु परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिकांचे पावसामुळे नुकसान झाले.

तालुक्यात यावर्षी संगेवाडी मंडळामध्ये सर्वाधिक 170 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे या मंडळमध्ये सर्वाधिक पिकांचे नुकसान झाल्यामुळे सध्या पिकांची पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागातील अधिकार व कर्मचारी शेताच्या बांधावर आले आहेत. परंतु पाऊस संपल्या संपल्या शेतकऱ्यांनी थोडेफार राहिलेले पिके हाती लागतील म्हणून पाण्यातच काढणी व मोडणी केली.

सध्या अधिकारी कर्मचारी पंचनामे करण्यास फिरत असले तरी शेतात अनेक शेतकऱ्यांनी पिकांची मोडणी केल्याने आता पंचनामे कशी करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु शेतकरीही आमचे नुकसान झाले असून थोडेफार राहिलेलं पिक हाती लागेल म्हणून काढणी केल्याचे पोटचिडकीने अधिकाऱ्यांना सांगत आहेत. अशा परिस्थितीत काय करायचं असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढे उभा आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी असे या मंडल मधील शेतकरी बोलत आहेत.

सरसकट नुकसान भरपाई मिळावी -

सध्या संगेवाडी मंडळमध्ये तालुक्यातील सर्वाधिक पाऊस झाला असून या मंडळमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंडळातील गावांमधील पिकांचे सध्या सुरू असलेले पंचनामे चुकीचे असून अनेक जणांनी नुकसान झालेल्या पिकांची मोडणी केली आहे. मोनी केलेल्या या पिकांचे काय होणार ? त्यामुळे असे पंचनामे न करता या मंडळातील सरसकट शेतकऱ्यांच्या पिकांनुसार नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

शासकीय नियमानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत त्यांनी स्थानिक पातळीवरील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शासनाचा आदेश जसा येईल त्याप्रमाणे नुकसानभरपाईचा अहवाल तयार करण्यात येईल - अभिजीत सावर्डे - पाटील, तहसीलदार, सांगोला.

सध्या पिकांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे केले जात आहेत

- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Vidhan Parishad election results BJP victory
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
Shocking Murder in Mohol: Woman and Two Sons Accused in Uncle’s Killing
tet exam
Marathi News Esakal
www.esakal.com