सोलापुर : "शेणाला आला सोन्याचा भाव" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Increase price of chemical fertilizers required for crops

सोलापुर : "शेणाला आला सोन्याचा भाव"

मोहोळ : पिकासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत ही खते घेऊन वापरणे परवडत नसल्याने शेतकरी आता शेणखताचा कडे वळला आहे त्यामुळे "शेणखताला सोन्याचा भाव" आला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात सध्या ऊस, मका, सोयाबीन, या सह खरबूज, काकडी, भोपळा, कलिंगड,ही वेल वर्गीय पिके आहेत. तर द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी या फळबागा आहेत. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खताची गरज असते. दाणेदार रासायनिक खतांबरोबरच बाजारात आता विद्राव्य खते ही उपलब्ध आहेत. मात्र या खतांचे दर गगनाला भिडले आहेत. सर्व सामान्य शेतकऱ्यांना ती वापरणे परवडणारी नाहीत त्यामुळे शेतकरी आता शेणखता कडे वळला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात किमान तीन ते चार दुभती जनावरे आहेत. त्या माध्यमातून शेणखत उपलब्ध होते.

जमिनीतील पिकांना रासायनिक खते वापरली तर त्यांचा परिणाम काही दिवसात जाणवतो, तसेच रासायनिक खतामुळे जमिन खराब होऊन तिचा पोत खराब होतो त्यामुळे ती नापिकी ची भीती आहे. त्यामुळे शेतकरी जमिनीत पिकाच्या अगोदर शेणखत घालत आहेत. शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारतो शेणखताचा परिणाम दोन वर्ष राहतो तसेच येणारी पिके जोमदार येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक खताच्या वापराने घेतलेली उत्पादने ही आरोग्यास घातक असतात तर शेणखत वापरलेली उत्पादने ही आरोग्यास फायदेशीर असतात किमान त्याचा दुष्परिणाम तरी होत नाही.

ज्यांच्याकडे जनावरे उपलब्ध नाहीत त्यांना 12 ते 13 हजार रुपयांना दोन ट्रॉल्या शेणखत विकत घ्यावे लागते. हा खत योग्य पद्धतीने वापरला तर दोन एकर फळबाग किंवा वेलवर्गीय पिकाला पुरतो. शेणखताच्या दोन ट्रॉली च्या किमतीत 11 ते 12 रासायनिक खताच्या पिशव्या येतात, यामुळे रासायनिक खताचा वापर कमी झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे जनावरे जास्त आहेत, परंतु जमीन कमी आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीला खत घालून उर्वरित खत विक्रीस उपलब्ध होतो त्यामुळे त्याच्या रोजच्या अर्थिक गरजा भागतात.

Web Title: Solapur Increase Price Of Chemical Fertilizers Required For Crops

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top