
प्रभुलींग वारशेट्टी
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेद्वारे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या शहरातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडिअममध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यासाठी अपूर्ण बैठक व्यवस्था, पंचतारांकित हॉटेल्सची कमतरता अन् विमानसेवेच्या कमतरतेमुळे अडथळा निर्माण होत आहे. या समस्या दूर करण्यासाठी लोकप्रतिनीधींसह सर्वस्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे.