

Solapur IT Park
esakal
सोलापूर:होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जलसंपदा विभागाची ५० एकर जमीन आयटी पार्कसाठी विनामोबदला देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरात जमिनीचे एमआयडीसीकडे हस्तांतरण करण्याचे आदेश दिले होते. मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली, पण हद्दनिश्चिती अभावी मोजणी शीटच तयार झाली नाही. यास आणखी चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. यावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मोजणी पूर्ण झाली आहे, किरकोळ त्रुटी आहेत, त्या दूर करून आठवडाभरात हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले.