Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
esakal
सोलापूर : सोलापुरातील प्रस्तावित आयटी पार्कसाठी सध्या होटगी रोडवरील जलसंपदा विभागाची जागा निश्चित करण्यात आली असली, तरी आयटी पार्क शहराबाहेर (Solapur IT Park new location update) नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती भागात असावे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता. १२) व्यक्त केले. त्यामुळे आयटी पार्कसाठी निश्चित झालेल्या जागेचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला असून नव्या जागेच्या शोधाची शक्यता निर्माण झाली आहे. (Uday Samant Solapur IT Park announcement)