सोलापुरातील तुरुंग कैद्यांनी झाले हाउसफुल्ल

क्षमता १४१ अन्‌ सध्या ३६७ कैदी
तुरुंग कैद्यांनी झाले हाउसफुल्ल
तुरुंग कैद्यांनी झाले हाउसफुल्लsakal

सोलापूर : गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून राज्यातील बहुतेक तुरुंग कैद्यांनी हाउसफुल्ल झाल्याची स्थिती आहे. सोलापूर शहरातील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १४१ एवढी असतानाही सध्या तुरुंगात तब्बल ३६७ कैदी आहेत.

कोरोना काळात कैद्यांना कोरोनाची बाधा होणार नाही, याची खबरदारी घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील जवळपास ७० कैदी कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आहेत. ते कैदी तुरुंगात आल्यास त्याठिकाणी जागेची कमतरता भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, तुरुंगाचा विस्तार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, निधीअभावी ते काम सध्या रखडले आहे.

विस्तारानंतर तुरुंगाची क्षमता जवळपास १२० ने वाढणार आहे. घरफोडी, खून, हाणामारी, महिला अथवा तरुणीवर अत्याचार, विनयभंग, चोरी अशा विविध गुन्ह्यातील कैदी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तुरुंगातील काही कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता ते कैदी कोरोनामुक्‍त झाले असून सर्वजण तुरुंगात आहेत. दिवसेंदिवस तुरुंगातील कैदी वाढू लागल्याने सध्याच्या मध्यवर्ती कारागृहाचा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. त्यासाठी शासनस्तरावरुन पुरेसा निधी मिळावा, अशी अपेक्षा तुरुंग प्रशासनाने व्यक्‍त केली आहे.

ठळक बाबी

  • न्यायालयात सुनावणी सुरु असलेले ३६७ कैदी सोलापूर मध्यवर्ती कारागृहात

  • शिक्षा लागल्यानंतर कैद्यांची केली जाते पुण्यातील येरवाडा कारागृहात रवानगी

  • तुरुंगाच्या विस्तारासाठी निधी नसल्याने मध्यवर्ती कारागृहात राहतात दाटीवाटीने कैदी

  • सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहाच्या विस्तारासाठी शासनाकडून निधीची अपेक्षा

सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात सद्यस्थितीत ३६७ कैदी आहेत. तुरुंगाची क्षमता १४१ कैद्यांची असून त्याठिकाणी तुरुंगाचा विस्तार केला जाणार आहे. विस्तारानंतर तुरुंगाची क्षमता १४१ कैद्यांनी वाढणार आहे.

- हरिभाऊ मेंड, तुरुंग अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com