सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

३० ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.
सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरूCanva
Updated on

सोलापूर : पोखरापूर (ता. मोहोळ) येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या सन २०२२-२३ वर्षासाठी प्रवेश परीक्षा २०२२ चे अर्ज ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.

ही परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार आहे. नवोदय विद्यालयाची सामान्य वैशिष्ट्ये, परीक्षेसाठी पात्रता, सविस्तर अधिसूचना इत्यादी परीक्षेसंदर्भाची अधिक माहिती, प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन अर्ज नवोदय विद्यालयसमितीच्या www.navodaya.gov.in तसेच https://cbseitms.nic.in/registrationClass६/registrationClass६ या वेबपोर्टलवर नि:शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रकातील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व नोंदणी पूर्ण झालेची खात्री करुन भविष्यातील संदर्भासाठी प्रवेश अर्जाची प्रिंट घ्यावी. प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास मोबाइल नंबर ९६२३३७०४९३, ९५७९७३४२००, ९८९०२४९६०७ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एस. सी. कोठडी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
drug
Marathi News Esakal
www.esakal.com