सोलापूर : कल्याणचा मटका आता ऑनलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Matka.

पोलिस कारवाईनंतर मटका आता ऑनलाइन ; चालकांची शक्कल

सोलापूर : शहरातील मटका चालविणाऱ्यांसह खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. कागदावरील चिठ्ठ्या, पेन व काह रक्कम असा मुद्देमाल शहर पोलिसांकडून कारवाईत जप्त केला जात आहे. पण, आता ही कारवाई टाळण्यासाठी कल्याणचा मटका चालकांनी ऑनलाइन पध्दत स्वीकारल्याची स्थिती आहे.

पान टपऱ्यांच्या आडोशाला मटका

शहरात हातभट्टी दारु आणि मटका, बनावट फ्रूट बिअर असे अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून दिसून येते. मटका हा प्रकार तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या काळात काही महिने पूर्णत: बंद झाला होता.

तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी कोंचिकोरवी नगरातील एका इमारतीवर छापा टाकून मोठा मुद्देमाल, कागदपत्रे जप्त केली होती. त्यात जवळपास ८० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता पान टपऱ्यांच्या आडोशाला मटका, जुगार सुरु असल्याचे चित्र आहे. त्यातील मूख्य सूत्रधाराला पकडल्यास निश्चितपणे हा प्रकार बंद होऊ शकतो, असा विश्वास सर्वसामान्यांना वाटत आहे.

Web Title: Solapur Kalyan Matka Online

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..