Solapur News: किणी ते सुलतानपूर रस्त्यावरील बोरी नदीवरील पुलासाठी 13 कोटी रुपये मंजूर

बोरी नदीवरील पुलाची अतिशय आवश्यकता या भागातील नागरिकासाठी होती
Solapur News, kalyan Shetti News
Solapur News, kalyan Shetti Newssakal

अक्कलकोट : किणी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा तसेच शेती आणि दळण वळण या दोन्हीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 13 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. किणी ते सुलतानपूर रस्त्यावरील किणी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरी नदीवरील पुलाची अतिशय आवश्यकता या भागातील नागरिकासाठी होती. (Solapur News)

किणी परिसरातील बहुतांश शेती ही बोरी नदीच्या पलीकडे सुलतानपूर शिवारात आहे. पावसाळ्यात सहा महिने बोरी नदीला पाणी असल्याने पलीकडचे आपल्या शेतीला जाण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागत असे. दीड किलोमीटरच्या अंतर पार करून जाण्यासाठी त्यांना पर्यायी पूल नसल्याने किणी परिसरातील नागरिकांना सुलतानपूर शिवारातील शेतीत जाण्यासाठी चुंगी ते हन्नूर ते सुलतानपूर असा 16 km चा प्रवास त्यांना करावा लागत असे. त्यामुळे प्रत्येकाला

एका फेरीला 32 किलोमीटर आंतर ज्यादा जावे लागत होते.याशिवाय किणीहुन शेतीसाठी बोरीनदीपलीकडे मंजूर घेऊन जाणे खूप त्रासदायक ठरत होते.यासाठी किणी परिसरातील नागरिक या बोरी नदीवरील पुलाचे बांधकाम होऊन मिळण्याबाबत प्रतीक्षेत होते. अक्कलकोटच्या उत्तर भागातील सर्वात महत्त्वाचा हा पूल आहे. या भागातील नागरिकांनी गेल्या पंचवीस वर्षांपर्यंत प्रलंबित प्रश्न न सुटल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता आणि हे सदर पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याला त्वरित प्रतिसाद देत

कल्याणशेट्टी यांनी शासन स्तरावर निधी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा केला या मागणीला अखेर यश आले असून पुरवणी अर्थसंकल्पात सदर पुलाच्या बांधकामासाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या पुलाच्या बांधकामाचे पूर्ततेने किणी परिसरातील नागरिकांना सोलापूरला जाण्यासाठी किणी सुलतानपूर ते नीलेगाव ते ईटकळ मार्गे सोलापूर किंवा किंवा सुलतानपूर ते हन्नूर मार्गे सोलापूर असा दुहेरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा रस्ता तयार होऊन मिळणार आहे. याशिवाय सदर रस्ता या पुलाच्या पूर्ततेनंतर नळदुर्ग किंवा तुळजापूर या दोन्ही शहरांच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जाणे अतिशय सुकर होणार आहे.

सदर पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात 13 कोटी मंजूर झाल्याने किनी पंचक्रोशीतील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळून त्यांचे शेती आणि इतर दळवणाच्या सुविधेत भर पडून त्यांना खूप मोठी मदत होणार आहे . सदर निधीच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले या निधी मंजुरीसाठी अक्कलकोटच्या किणी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करत असल्याचे कल्याण शेट्टी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com