Solapur: कोणार्क एक्‍सप्रेस दरोड्यातील आरोपी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपी जेरबंद
कोणार्क एक्‍सप्रेस दरोड्यातील आरोपी जेरबंद

कोणार्क एक्‍सप्रेस दरोड्यातील आरोपी जेरबंद

केत्तर : मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्‍सप्रेसवर चोरट्यांनी दगडफेक करुन लुटण्याचा प्रकार २६ ऑक्‍टोंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकाजवळ घडला होता. या घटनेतील संशयित दोन आरोपींना दौंड पोलिसांनी तपास करीत मुद्देमालासह अटक केली आहे. यात करमाळा येथील एकाचा समावेश आहे.
दीपक चंद्रकांत मुंगळे (वय ३०) भगतवाडी (ता. करमाळा), कुंजीर अहिऱ्या (वय१९)(रा. खडकी ता. दौंड )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. महिला प्रवाशांचे चोरलेले १ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आरोपींकडून जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ Live : मॅच रंगतदार स्थितीत

२६ ऑक्‍टोबरच्या रात्री ९ च्या दरम्यान कोणार्क एक्‍सप्रेस धावत असताना चोरट्यांनी सिग्नलची वायर कापल्याने गाडीला सिग्नल मिळाला नाही व गाडी दौंडजवळ थांबली. त्यावेळी गाडीतील बोगी क्रमांक एस-१ आणि एस - ४ यामधील सोलापूर येथील मीनाक्षी शिवपुत्र गायकवाड (वय २९) व कल्पना विनायक श्रीराम (वय ५९) यांच्या गळ्यातील चैन व मंगळसूत्र असा सोन्याचा ऐवज लुटून नेला. यावेळी तब्बल १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता.

या गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत क्षीरसागर, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड मार्ग पोलिस स्टेशनचे युवराज कलगुटके, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंतरकर, पोलिस उपनिरीक्षक कोळपे, पोलिस कर्मचारी सुनील कदम, आनंद कांबळे, धीरज भोसले, राजू काटे, अनिल सावंत, सरफराज खान, रमेश पवार आदींच्या पथकाने कारवाई केली.

loading image
go to top