Solapur News: लोकसभेसाठी शिंदे पिता-कन्येबद्दल पसंती अन् ना पंसतीच्या वावड्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PRANITI SHINDE SUSHILKUMAR SHINDE

Solapur News: लोकसभेसाठी शिंदे पिता-कन्येबद्दल पसंती अन् ना पंसतीच्या वावड्या!

- शिवाजी भोसले

Solapur News - सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या निवडणुकीचे वारे आत्तापासूनच जोरदारपणे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून येथे खुद्द पक्षातच पसंती आणि नापसंतीच्या मोठ्या वावड्या उठल्या आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या राजकीय वारसदार तसेच विधानसभेला हॅट्रिक साधणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसा खुद्द पक्षातूनच तीव्र विरोध होत आहे.

दुसरीकडे, सुशील शकुमार शिंदे यांनीच या खेपेची लोकसभा लढवावी, यासाठी त्यांच्यावर पक्षातूनच कार्यकर्त्यांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

अशातच राजकारणात वेगळे वलय तसेच अस्तित्व आणि तरुणाईमध्ये आकर्षण असलेल्या विकासाभिमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या हाती 'कमळ' देऊन सोलापूर लोकभेच्या या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी साधण्यासाठी भाजपाकडून सोंगट्या टाकल्या जात आहेत.

प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीला पक्षामधील होत असलेला विरोध लक्षात घेता, भाकरी फिरवून याच मुद्द्याच्या आधारे प्रणिती शिंदे यांना भाजपात घेण्याचा 'मास्टरस्ट्रोक' मारण्याच्या हालचाली या पक्षात होत असल्याची अत्यंत गुप्त चर्चा आहे.

विशेषत्वे, वयाची ऐंशी गाठणाऱ्या सुशीलकुमारांनी सोलापूर लोकसभेची जागा स्वत: अडवून न ठेवता, ती तरुणाईसाठी मोकळी करून द्यावी.

या जागेवर त्यांची राजकीय वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची उमेदवारी घेण्यास भाग पाडून येथे 'विकासाचे कमळ' फुलवावे, अशी धारणा आणि विचारप्रवाह भाजपाच्या गोटात आहे.तसे प्रयत्नही भाजपाच्या वतुर्ळात सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजप प्रवेश होण्याच्यादृष्टीने त्यांचे मन वळवण्यासाठी तसेच मध्यस्ती करण्यासाठी कोणता 'वजनदार' चेहरा चालेल, याची चाचणी भाजपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चालू आहे.

वास्तविक काँग्रेस हा आमचा 'श्वास' आणि 'ध्यास' आहे, आपण काँग्रेस पक्ष कधीच सोडणार नाही, आपला भाजप प्रवेश कधीच शक्य नाही. उलट या पक्षाकडूनच तशा वावड्या उठवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहे हा भाग वेगळा.

पण आरक्षीत सोलापूर लोकसभेसाठी भाजपाच्या विजयाची हॅट्रिक साधताना आमदार प्रणिती शिंदे यांच्या एवढा सक्षम तुलनात्मक चेहरा सर्वच आघाड्यांवर चेहरा त्यामुळे भाजप प्रवेशासाठी प्रणिती शिंदे यांच्यासाठीच प्रयत्न व्हावेत, अशी चर्चा स्थानिक नेतृत्वांनी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील 'भाजपाचे देवेंद्र फडणवीस' यांच्याकडे केल्याचीसुध्दा चर्चा या पक्षाच्या गोटात आहे.

सोलापूर सभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाला खुद्द त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला हे गंभीर मानले जात आहे, त्याचाच फायदा प्रणिती शिंदे यांना भाजपात घेऊन सोलापूर लोकसभेची उमेदवारी त्यांना देता येईल, का याचेही आडाखे भाजपात बांधले जात आहेत.

सध्या जरी अशा शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्या तरी राजकारणात कधीही काही होऊ शकते या शक्यतेभोवतीदेखील चर्चेचे वादळ घोंगावत आहे.

सुशीलकुमारांची 'ती' वक्तव्य अन् प्रणितींतच्या प्रवेशाची चाचपणी

धर्मनिरपेक्षतेवर नेहमी बोलणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी भगव्या दहशतवादावर भाष्य केले आहे, त्यांचे हे भाष्य आमदार प्रणिती शिंदे यांचा जर भाजपा प्रवेशाचा विचार होऊ लागला तर आड येऊ शकते.

कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुशीलकुमार यांची भगव्या हदहशतवादाची वक्तव्य पटलेली नव्हती, त्यांच्या या वक्तव्यांना संघवाल्यांचा आक्षेप राहिला. खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील आपल्या पित्याच्या भगव्या दहशतवादाचा समर्थन केले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपा प्रवेशाची वाट अत्यंत खडतर आहे, अशी ही चर्चा भाजपाच्या गोटात आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांची ती वक्तव्य जुनी पुराणातली वांगी असे समजून प्रणिती शिंदे यांच्या रूपाने सगळ्यात सक्षम नेतृत्व भाजपाला सोलापुरात मिळू शकते, असा सकारात्मक विचार झाल्यास प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या वाटेतील काटे दूर होऊ शकतात असाही बोलबाला आहे.