
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तिरवंडी (ता. माळशिरस) येथील हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याचे आज समोर आले आहे. लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. जिल्ह्यातील २४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून सध्या ४८ लम्पी बाधित जनावारांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ७२ गाय/बैल व एक म्हैस अशा ७३ जनावारांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी २३ गाय व १ म्हैस, अशी एकूण २४ जनावारे बरी झाली आहेत. सद्य:स्थितीत ४८ गाई लम्पी बाधित आहेत. आतापर्यंत ४२ हजार ८९१ जनावारांना लसीकरण झाले आहे. जिल्ह्यासाठी सध्या लम्पी लसचे १ लाख ८८ हजार ६०९ डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत माळशिरस तालुक्यात ४९, सांगोला तालुक्यात ११, उत्तर सोलापूर तालुक्यात ४, माढा तालुक्यात ५, मंगळवेढा तालुक्यात १, पंढरपूर तालुक्यात २ व बार्शी तालुक्यात १ लम्पी बाधित जनावर आढळले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.