Solapur : लंपीच्या साथीने जनावराची बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी

लंपी आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्ह्यातील जनावराचे बाजार बंद करण्याचे आदेश
solapur Lumpy infection
solapur Lumpy infectionsakal

मंगळवेढा : लंपी सदृश्य आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील जनावराचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले असतानाच लंपीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मंगळवेढा येथील पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यातील शासकीय व खाजगी डॉक्टरांचे बैठक घेऊन त्यांना लंपी बाबत पशुपालकांत जनजागृती करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या

  राज्यामध्ये जळगाव अकोला अहमदनगर कोल्हापूर बीड पुणे धुळे सातारा औरंगाबाद बुलढाणा लातूर अमरावती उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये लंपी सदस्य आजाराची लक्षणे दिसून आले आहेत सध्या माळशिरस तालुक्यामध्ये ही या रोगाची लक्षणे दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला. दोन वर्षापूर्वी तालुक्यात लंपीच्या साथीचा विळखा पडला होता कोरोनात पशुखादयाचे वाढलेले दर व दुधाला मिळणारा कमी दर यामुळे पशुपालकांचे कंबरडे मोडले असतानाच लंपीचा विळखा तालुक्यात पसरला तरीही पशुसंवर्धन विभागाने खासगी डॉक्टराची मदत घेवून लसीकरण पुर्णत्वास नेले यंदा अन्य तालुक्यात लंपीची लक्षणे दिसून आल्यामुळे दुष्काळी तालुक्यात रोजगाराचे कोणतेही मोठे साधन नसल्यामुळे दोन वर्षात पशुधनात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने तालुक्यात दुधउत्पादन वाढले असून अनेक बेरोजगारांनी गायीपालनांचा पर्याय निवडला पण हीच जनावरे रोगाला बळी पडू नये म्हणून पशुसंवर्धन विभात आताच सावध झाला असून.

तालुक्यातील सर्व शासकीय व खासगी डॉक्टराची पंचायत समितीच्या सभागृहात तालुका पशुधन अधिकारी सुहास सलगर,पशुवैदयकीय अधिकारी ब्रम्हानंद कदम,अविनाश पांगे,रविद्र बंडगर,तानाजी भोसले,पांडूरंग हंबरडे,यांच्यासह खासगी डॉक्टराची बैठक घेवून त्यात शेतकय्रात जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या बाजारातून नवीन जनावराची खरेदी थांबविण्याचे आवाहन करत पशुपालकांनी लंपी सदृश्य रोगाबाबत घाबरुन न जाता वेळीच उपाययोजना करुन लंपीपासून जनावराचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले सध्या तालुक्यात 92 हजारापेक्षा अधिक गाय,म्हैस,बैल,जर्सी असे पशुधन असून पशुसंवर्धन विभागात रिक्त पदे मोठया प्रमाणात असताना देखील खासगी डॉक्टराच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येत आहे.

गोमाशा,डास, बाधित जनावरे याचा शिरकाव गोठयात होवू नये यासाठी काळजी घ्यावी, बाधित जनावरे इतर जनावराच्या कळपात सोडू नये प्रसंगी गोचीड,गोमाशी निर्मुलनासाठी औषध फवारणी करावी,गोठयात गोवरीचा जाळून त्यावर कडूनिंबाचा पाला टाकल्यास डासपासून जनावराचे सरंक्षण होवू शकते त्यातून लंपीसदृश्य रोगाची लक्षणे दिसत पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com