Solapur Politics : सोलापूर,माढा लोकसभेसाठी भाजपचे‘वॅारिअर्स’

मुरलीधर मोहोळांकडून तयारीचा आढावा; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्याची तयारी
Solapur Politics
Solapur PoliticsSakal

Solapur News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा दौरा येत्या आठवड्यात होत असून हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक पातळीवर जय्यत तयारी सुरु आहे.

शिवाय याच दौऱ्यात सोलापूर आणि माढा लोकसभेतील विधानसभानिहाय ‘वॅारिअर्स’सोबत प्रदेशाध्यक्ष लोकसभा निवडणुकीचा तयरीचा श्रीगणेशा होणार आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्षांचा दौरा आणि वॅारिअर्सच्या तयारीचा आढावा भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. दौऱ्याच्या यशस्वीतेसंदर्भात विविध सूचना मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मोहोळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीस खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सोलापूर लोकसभा समन्वयक अमर साबळे, सोलापूर लोकसभा प्रभारी विक्रम देशमुख,

सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, शहर सरचिटणीस शशिकांत चव्हाण, मनीष देशमुख, विकास वाघमारे, भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, भाजयुमो शहराध्यक्ष किरण देशमुख, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, भाजपाच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात सोलापूर आणि माढा लोकसभा क्षेत्राचा दौरा प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे करत आहेत.

या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. शिवाय ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील.

Solapur Politics
Solapur News : पंतप्रधानांचा २५ डिसेंबरला सोलापूर दौरा शक्य

दौऱ्याचे स्वरूप आणि त्यासंदर्भातील विविध मुद्दे यावर सविस्तर चर्चा पदाधिकाऱ्यांशी केली असून प्रदेशाध्यक्षांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी जोमाने कार्यरत आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजित स्थळांची पाहणीही सर्वांसमवेत केली आहे,

असेही मोहोळ म्हणाले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, मोहोळ यांनी सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदार संघामधील वस्तुनिष्ठ परिस्थितीची माहिती जाणकार पदाधिकाऱ्यांकडून घेतली. व्यूहरचनेसंबंधी मार्गदर्शन केले.

Solapur Politics
Solapur News : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय लावून धरू; आमदार प्रणिती शिंदे

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वॅारिअर्स महत्त्वाची भूमिका बजावणार असून हेच वॅारिअर्स निवडणुकीचे शिलेदार असणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात या वॅारिअर्सची निवड करून त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

-मुरलीधर मोहोळ,भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आणि प्रदेश सरचिटणीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com