परिचारिकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसला आहे.
परिचारिकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसला आहे.sakal

सोलापूर : ओ साहेब...सलाईन संपले आहे, थोडं बघा की!

‘सिव्हिल’मधील रुग्णाच्या आईची आर्त हाक; रुग्णांच्या स्ट्रेचरला नातेवाइकांचा आधार

सोलापूर: वेळ सकाळी अकराची... स्थळ सिव्हिल हॉस्पिटल... स्रीरोग विभागात ४५ वर्षीय महिला उपचार घेत आहे... तिला लावलेले सलाईन संपलेले... यामुळे सलाइनच्या पाइपमधून उलट दिशेने रक्त येण्यास झाली सुरवात... सोबत असलेली रुग्णाची ६५ वर्षीय आई ‘ओ साहेब... ओ नर्स...’ अशी आर्त हाक देत होती... काही कालावधीनंतर एक डॉक्टर ‘काय झाले आहे’ असे विचारत संपलेले सलाईन बंद केले... हा सर्व प्रकार सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘बी’ ब्लॉकमधील स्त्रीरोग विभागात ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आला. गुरुवारपासून परिचारिका संपावर गेल्याने सिव्हिलमधील रुग्णसेवाच सध्या सलाईनवर आहे.

परिचारिकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसला आहे. परिचारिकांची कामे डॉक्टरांना करावी लागत आहेत. परिचारिकांविना ब्रदर्सवर कामाचा ताण वाढला आहे. यामुळे रुग्णांना स्ट्रेचरवरून ने-आण करणे व इतर कामे रुग्णांच्या नातेवाइकांनाच करावी लागत असल्याचे चित्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिसून आले.

शासनाने कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावी आदी मागण्यांसंदर्भात २३ मेपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यात आंदोलनास सुरवात झाली आहे. परंतु शासन दाद देत नसल्याने २६ व २७ मे रोजी दोनदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात आले. मात्र तरीही शासनाने दखल घेतली नसल्याने परिचारिकांनी शनिवार (२८ मे) पासून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरवात केली आहे. यामुळे रुग्णसेवा आणि डॉक्टरांची धावपळ होताना पाहायला मिळत आहे. जोपर्यंत १०० टक्के मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर हजर होणार नाही, असा पवित्रा परिचारिकांनी घेतला आहे. आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका

‘सिव्हिल’मध्ये २१० पदे रिक्त

सिव्हिल रुग्णालयात ७५० बेडची सुविधा आहे. यासाठी परिचारिकांच्या मंजूर पदांची संख्या ५८६ आहे. यातील २१० पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक कारणांसाठी काही परिचारिका सुटीवर आहेत. सिव्हिलमधील ३०० व विमा हॉस्पिटलमधील १०० अशा ४०० परिचारिका बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी आहेत. तीन शिफ्टमध्ये परिचारिकांचे काम चालते. परिचारिकांना सकाळी व दुपारच्या शिफ्टमध्ये आठ तास काम करावे लागते तर रात्रपाळीत १२ तास काम करावे लागत असल्याचे यावेळी परिचारिकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com