Solapur : लोकसहभागातून मंगळवेढ्यात पुतळ्याची उभारणी

तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
प्रशांत गायकवाड माजी अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती मंडळ
प्रशांत गायकवाड माजी अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती मंडळsakal

मंगळवेढा : तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरात लोकसभागातून उभा करण्यासाठी तरुणांचा पुढाकार कौतुकास्पद ठरला असून पुतळ्यासाठीचा लोकसहभाग वाढला आहे. याशिवाय आणखीन तीन पुतळे शहराच्या प्रमुख ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.

संपूर्ण देशाला मंगळवेढ्यातील संतानी व इथल्या सर्व धर्मीय नागरिकांनी वेगळाच आदर्श घालून दिला आहे.मुस्लिम ऊरूसा दरम्यानच्या धार्मिक कार्यामध्ये हिंदूंचा सहभाग कौतुकास्पद आहे तर हिंदूंच्या सणांमध्ये देखील मुस्लिमांचा सहभाग आहे त्यामुळे इथला धार्मिक एकोपा हा देशाला आदर्श घालणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श मंगळवेढा शहराला लागला इथल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये ते मुक्कामी राहिले ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था झाली.

शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी शहराच्या प्रमुख चौकात थोर महापुरुषांचे पुतळा बसवण्याचा संकल्प केला त्यामध्ये शिवप्रेमी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भुईकोट किल्ला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शहीद किसन माने चौक(बोराळे नाका) राजमाता अहिल्यादेवी यांचा पुतळा लोकसभागातून उभा करण्याचा संकल्प सर्व धर्मीयातील प्रमुख मान्यवराच्या व ज्येष्ठाच्या पुढाकाराने केला.

यासाठी शहर व तालुक्यावरील नागरिकांना यात सहभाग घेण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 31 लाख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या पुतळ्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये तर राजमाता अहिल्यादेवी पुतळ्याला 16 लाखाचा खर्च अपेक्षित धरून त्यानुसार मूर्तिकाराला अ‍ॅडव्हान्स दिला. मूर्तीचे कामकाज अंतिम टप्यात आले

असून लवकरच शहराच्या प्रमुख चौकात पुतळे बसवून त्यांच्यापासून आदर्श घेण्याच्या दृष्टीने इथल्या तरुणांनी सहभाग वाढवून सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये सरळ हाताने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले त्यामध्ये नागरिकांनी देखील चांगल्या पद्धतीचे सहभाग दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी निश्चित खर्चापेक्षा चबुतय्रासाठी व पुतळा आणण्यासाठी जवळपास 40 लाखाचा खर्च अपेक्षित आहे आतापर्यंत सत्तावीस लाख रुपये लोकसभागातून जमा झाले. त्यामुळे लवकरच हे पुतळे शहरवासीयांसाठी आदर्श ठरणारे आहेत.

तमाम महाराष्ट्रासह देशाला आदर्श ठरणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्थापनेनंतर मंगळवेढेकरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचा पदस्पर्श ठरलेला शहरातील भुईकोट किल्ला व कृष्ण तलावाच्या संवर्धनाकडे शासनानेही लक्ष देण्याची गरज आहे

प्रशांत गायकवाड माजी अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com