Solapur : महापुरुषाच्या अवमान प्रकरणी मंगळवेढ्यात कडकडीत बंद

राज्यपाल भगतसिंग कोशारी, सुधांशू त्रिवेदी, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,
solapur
solapur sakal

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा राज्यातील थोर महापुरुषाविषयी राज्यपाला सह भाजपच्या नेत्यांनी अपमानास्पद व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे विविध महापुरुषाचे जयंती उत्सव मंडळ व विविध संघटनेच्या वतीने आज मंगळवेढ्यात कडकडीत बंद चे आयोजन करण्यात आले. यामध्ये शहरातील व्यापाऱ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

राज्यपाल भगतसिंग कोशारी, सुधांशू त्रिवेदी, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आ.प्रसाद लाड, मंगल प्रसाद लोढा, नुपूर शर्मा, या भाजपच्या नेत्यांनी राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज सह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज मंगळवेढ्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव मंडळ, महात्मा फुले उत्सव मंडळ, महात्मा बसवेश्वर उत्सव मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी उत्सव मंडळ,

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ व समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने आज मंगळवेढा बंदचे आयोजन केले.याला मंगळवेढा येथील व्यापारी संघटनेने पाठिंबा देत आज सकाळपासून शहरातील सर्व दुकाने बंद होती त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्यांना अचानक या बंदचा फटका सोसावा लागला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दामाजी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहरातून मोर्चा काढून शहरातील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून या मोर्चाचा समारोप प्रांत कार्यालयावर करण्यात आला राज्यपालासह भाजपच्या इतर नेत्यावर चुकीचे बोलल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार पंकज राठोड यांना देण्यात आले

या मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे दामाजी कारखाने संचालक मुरलीधर दत्तू,लतीफ तांबोळी, प्रवीण खवतोडे नारायण गोवे मारुती वाकडे प्रा.येताळा भगत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संभाजी घुले,गैबीपीर उरूस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर कौडूभैरी, सतीश दत्तू,राहुल सावजी, सिद्धार्थ लोकरे, आदी शहरातील विविध धर्माचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com