Solapur : वारीइतक्याच गर्दीवर DYSP पोलीस निरीक्षकाचा बंदोबस्त यशस्वी

लाखो भाविकांच्या उपस्थितीत महालिंगराया देवाची यात्रा
Mangalwedha Mahalingaraya yatra
Mangalwedha Mahalingaraya yatra

मंगळवेढा :- तालुक्यात दिवाळीत हुलजंतीत झालेली महालिंगराया देवाच्या यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली. लाखोच्या जनसमुदायाला उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बंदोबस्ताने निर्वीध्नपणे पार पडली असली तरी भविष्यात लाखो भाविकासाठी शासनाने यात्रेसाठी स्वतंत्र आराखडा करुन चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे.

दिवाळीत या ठिकाणी सात पालख्याच्या भेट सोहळा भंडारा,खोबरे,लोकरीच्या उधळणीत आयोजित केला जातो यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश गोवा या ठिकाणीवरुन भाविक खासगी वाहनाने आलेले असतात ही संख्या जवळपास पाच लाखापेक्षा अधिक असते.

पंढरपूरच्या वारीसाठी सोलापूरशिवाय इतर जिल्हयातील अप्पर पोलीस अधिक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात केला जातो. तितक्याच प्रमाणात भाविक परराज्यातून हुलजंतीत येत असल्याने महाराष्ट्राच्या प्रशासनानाला याचा अंदाज बांधता येईना हे भाविक अन्य भाषिक असल्याने बंदोबस्तात असलेल्या कर्मचाय्रावर अतिरिक्त ताण व भाषेचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने याचे नियोजन प्रशासनाने करुन त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त तैनात करणे आवश्यक आहे.

परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.यात्रेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्डच्या माध्यमातून बंदोबस्त केला असला तरी त्यातही नंदेश्‍वरच्या खून व आत्महत्या प्रकरण घडल्याने यात्रा बंदोबस्त व इतर प्रकरणाचा तपास करताना पोलीसाना दिवाळीचा सण कुटूंबासमवेत उत्साहात साजरा करता आला नाही.

यात्रेतील परराज्यातील गर्दी विचारात घेता भाविकासाठी 100 एकर जमीन संपादीत करुन राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांसाठी वाहनतळ, शौचालय,पाणी,आदी सुविधा करणे आवश्यक आहे.तशी जमीन देखील मंदीरापासून काही अंतरावर उपलब्ध आहे.

याशिवाय पालखी भेट सोहळा ओढयातील पाण्यात होत असल्याने चेंगराचेंगरा होण्याची शक्यता म्हणून ओढयात घाट तयार करुन भाविकांना पालखीसह ये जा करणे सोयीचे होणार आहे. शिवाय आरोग्य सुविधा देखील सक्षम करण्याची गरज आहे वाढत्या गर्दीतून साथीच्या रोगाचा प्रसार होण्याची शक्यत असून म्हणून आरोग्य सुविधा सक्षम करताना प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्‍न देखील मार्गी लागणे आवश्यक आहे.

सध्या ट्रस्ट संबधित प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यंदा यात्रेचे जबाबदारी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली त्यामुळे त्यांनीच यात पुढाकार घेवून भविष्यातील यात्रेचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.टेभूर्णी विजयपूर महामार्गामुळे रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली तरी भाविकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने या यात्रेचे ब्रॅडींग करणे गरजेचे आहे कोल्हापूर जिल्हयातील पटटणकोडोलीची यात्रा ज्या प्रमाणे राज्यभर प्रसिध्द झाली त्याप्रमाणे हुलजंतीची यात्राही प्रशासनाने नियोजन करुन राज्यभर नेण्याची गरज आहे त्यातून भाविकांची संख्या वाढून नवे रोजगार,व्यवसायाकीला संधी निर्माण होऊ शकतील.

वारीइतकेच भाविक परराज्यातून येतात पण प्रशासनाने वाढत्या गर्दीचा अंदाज घेवून यात्रेचा प्रसार वाढविण्यासाठी प्रशासनाने यात्रेपुर्वी नियोजन करुन पोलीस बंदोबस्त,वाहनतळ,शौचालय,पाणी,आरोग्य आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत स्वतंत्र आराखडयाची गरज आहे

- सुधाकर मासाळ,हुलजंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com