

Wari Family Provides Winter Relief in Manglawedha
Sakal
मंगळवेढा : शहरात सध्या कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले आहेत अशा परिस्थितीत रस्त्यावर,झोपडीमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या 200 गरजुंना वारी परिवाराने ब्लॅंकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली. सद्या थंडीचा जोर वाढला असून या थंडीने सर्वसामान्य नागरिक कुडकुडला आहे तर अनेकांनी सध्या शेकोटीचा आधार देखील घेतला आहे.