
सोलापूर : यंदा अद्याप आवक वाढलेली नसतानाही केवळ पावसाने खराब झालेल्या मालामुळे लाल मिरचीच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांनी घट झाली आहे. गतवर्षी प्रतिक्विंटल २० हजारांचा दर मिळत होता. यंदा सततच्या पावसामुळे मालाची गुणवत्ता घसरल्याने लाल मिरचीचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.