esakal | Sangola: लग्नासाठी दिले दीड लाखांचे कमिशन, लग्नानंतर नववधू अडीच लाख घेऊन फरार
sakal

बोलून बातमी शोधा

नववधू अडीच लाख घेऊन फरार

सांगोला : लग्नासाठी दिले दीड लाखांचे कमिशन, लग्नानंतर नववधू अडीच लाख घेऊन फरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगोला : लग्न लावण्याकरता मध्यस्थास एक लाख ६५ हजार दिले. लग्नही झाले परंतु लग्नानंतर आठ दिवसात नववधूने घरातील कपाटातील २ लाख ५० हजार घेवुन पाबोरा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शक्कल लढवून मध्यस्थास दुसऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून बोलावून घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सांगोल तालुक्‍यात घडली. याबाबतची फिर्यादी गोपाळ देविदास साळुंखे (रा. बामणी, ता. सांगोला) यांनी पोलिसात दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी गोपाळ देविदास साळुंखे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून शेती करतात. त्यांनी मध्यस्थास १ लाख ६५ हजार रुपये देऊन उषा बालाजी हांडे (रा. अहमदपूर, जि. लातूर) हिच्याशी १९ सप्टेंबर रोजी विवाह केला. विवाहाच्या अगोदरच मध्यस्थीने एक लाख ६५ हजार रुपये घेऊन आठ दिवसानंतर सर्व कागदपत्रे घेऊन येऊन घेऊन कोर्टात लग्न करण्याकरता येतो, असे सांगून नवरी मुलीकडील आलेले आठ ते दहा लोक तात्काळ निघून गेले.

हेही वाचा: नाशिक : चार लाखांचा कोरोना रुग्णांना परतावा

विवाहानंतर २७ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या घरातील सर्वजण डाळिंब तोडण्यासाठी गेले असता पाऊस आला. पाऊस आल्यानंतर विवाहितेने माझे पायातील जोडवी पडल्याचा बहाना करत शेतात निघून गेली ती परंतु माघारी आलीच नाही. यावेळी शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. त्यावेळी घरातील ट्रान्सपोर्टसाठी ठेवलेले दोन लाख ५० हजार रुपये मिळून आले नाहीत. यावेळी फिर्यादीने शक्कल लढवून मध्यस्तीला फोन करून दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून बोलावून घेतले.

मध्यस्थीचे पैसे माघारी द्या, नाहीतर पोलिसात गुन्हा दाखल करतो असे सांगितले. परंतु पैसे माघारी न दिल्याने फिर्यादीने गंगाबाई हनुमंत वाघमारे, श्रावण हनुमंत वाघमारे (दोघे रा. उंदरी, ता. मुखेड, जि. नांदेड), उषा बालाजी हांडे (रा. अहमदपूर, जि. लातूर), तुकाराम आगलावे पाटील, सुमनताई आगलावे पाटील (रा. घन्सी तांडा, उदगीर, जि. लातूर) या पाच जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

loading image
go to top